उंचगाव हायवेपुल ते गडमुडशिंगी कमान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको

उंचगाव: हुपरी – कोल्हापूर रस्ता हा उंचगाव हायवेपूल ते गडमुडशिंगी कमान रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने वारंवार प्रशासनाला निवेदन देवूनही रस्ता दुरुस्तीसाठी दुर्लक्ष केल्याने करवीर शिवसेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

हुपरी – कोल्हापूर रस्ता हा उंचगाव हायवेपुल ते गडमुडशिंगी कमान मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले असून येथे खड्ड्यामुळे छोटे मोठे रोज अपघात खड्डे चुकवण्याच्या नादात होत आहेत. हुपरी -कोल्हापूर हा राज्य मार्ग असल्याने तसेच सूतमिलचे कंटेनर, स्कूल बसेस अशा मोठ्या रहदारीचा हा मार्ग असल्याने दि.२६/०७/२०२२ रोजी निवेदन देवूनही व दि. २९/०८/२०२२ रोजी खड्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे फलक लावूनही हा रस्ता अद्याप प्रशासनाच्या गलथान नियोजनामुळे नवीन किंवा दुरूस्ती केला गेला नाही. सदर रस्त्यावरून हुपरी, कोडोली, गडमुडशिंगी सह, कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे. तसेच उंचगावातील मणेरमळा, सांगवडे, वसगडे गावातील ही मोठी रहदारी असलेला हा रस्ता दुरुस्ती किंवा नविन केला नसल्याने करवीर शिवसेनेच्या वतीने बुधवारी हुपरी – कोल्हापूर हा राज्य मार्ग हॉटेल गणेशरत्नच्या दारामध्ये रास्ता रोको करण्यात आले. यानंतर ही प्रशासनाने जर रस्ता चागल्या पध्दतीने दुरुस्ती किंवा नवीन केला नाहीत तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दारामध्ये करवीर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी राजू यादव बोलताना म्हणाले की, याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते त्यानंतरही काम सुरू झाले नसल्याने सा.बां. विभागाच्या नावाचे फलक खड्ड्यामध्ये लावले होते. तरीपण प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. म्हणून आता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. जर यापुढेही रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फसण्यात येईल असा इशारा करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिला.

यावेळी पोपट दांगट, दिपक पाटील, विक्रम चौगुले, शरद माळी, दिपक रेडेकर यांनी आपली मनोगते व्यक्त करताना सार्वजनिक बांधकाम विभाग व शिंदे-फडणवीस सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.
रास्ता रोकोवेळी कोल्हापूर-हुपरी राज्यमार्गावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी गांधीनगरच पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक शाखा अभियंता श्रीकांत सुतार यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव,उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट,उपतालुकप्रमुख दिपक पाटील, मा.उपतालुकप्रमुख विक्रम चौगुले, हिंदुत्ववादी शरद माळी, उंचगाव गावप्रमुख दिपक रेडेकर, फेरीवाले संघटना तालुकाप्रमुख कैलास जाधव, युवासेना समन्वयक सागर पाटील, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, फेरीवाले संघटनेचे उपतालुकाप्रमुख बाळासो नलवडे, वाहतूक सेनेचे दत्ता फराकटे, प्रफुल्ल घोरपडे,शफीक देवळे, उल्फत मुल्ला, सूरज पाटील, राजू राठोड, शहनशहा लतीफ, मुजावर खाटीक, यासिन सय्यद, अजित चव्हाण, बाबुराव पाटील, परवेश गोलंदाज, अभिजित यादव, राजू वासुदेव, मनोज कुरळे, आनंदा मेगाणे, विकास लोकरे,गणेश माळी, प्रथमेश शिरोळ, स्वप्नील देशमुख, गणेश पाटील, अतिष शिरगावे, महावीर देळवे, सूरज पाटील,गौरव चव्हाण आदी उपस्थित होते.