कोल्हापूर प्रतिनिधी : महापालिकेच्या के.एम.टी. प्रशासनाकडून शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवा’ आज सोमवार पासून सुरु करण्यात आली. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या हस्ते बसचे पुजन करून शुभारंभ करण्यात आला.
या बससेवेसाठी आगाऊं आरक्षण आणि इतर माहितीसाठी के.एम.टी.च्या शाहू मैदान पास वितरण केंद्र येथे स्वतंत्र माहिती कक्ष सुरु करण्यात आला आहे. दि.२६/०९/२०२२ ते ०४/१०/२०२२ अखेर सकाळी ९.००/१०.००/११.००/१२.०० या वेळेला बसेस सुटतील.याचे तिकीट दर प्रौढास १७० रु. व लहानास ८५ रु. असा आहे.
अधिक माहितीसाठी सकाळी ९.०० ते सायं.४.०० पर्यंत २६४४५६६ ते ७१ /९४२३२८०७१९/ ९७६४५०६७१६/९७६५३१३९९८) यावर संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आले आहे. चालुवर्षी ग्रुप बुकींगसेवा बंद ठेवण्यात आली आहे. तरी, या बस सेवेचा लाभ बहुसंख्य भाविकांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.
यावेळी दुर्गादर्शन प्रमुख सुनिल जाधव, के.एम.टी. यंत्रशाळा व्यवस्थापक किरण चव्हाण,वाहतूक निरिक्षक आर.एस.धुपकर, जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार, अकौंटंट .अरुण केसरकर, अपघात प्रमुख प्रदिप जाधव, दिनेश सोमण, स्टँड इनचार्ज नितीन पोवार, सहा.वाहतूक निरिक्षक एस.एच.पाटील, अरुण घाटगे, श्रीकांत सरनाईक, दिघे, हनुमान लोहकरे, हेमंत हेडाऊ, सागर वंजारे, विवेक साठे, मोहन मुदगल व के.एम.टी.च्या वाहतूक विभागाकडील चालक/वाहक कर्मचारी तसेच वर्कशॉप विभागाकडील कर्मचारी/अधिकारी तसेच भाविक प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.