कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्हा परिषदे मार्फत आज बुधवारी जागतिक स्मृती भ्रांश दिन साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी.रणवीर यांनी स्मृती भ्रंश आजाराची लक्षणे उपचार व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
दरम्यान, शिंगणापूर येथील जेष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या मातोश्री वृद्धाश्रमच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर व सूर्यप्रभा चिटणीस यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे तसेच समाज कल्याण विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.