संजय सुतार यांचे कार्य कौतुकास्पद : आमदार पी. एन. पाटील


बालिंगा ( प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पहिले बांधकाम कामगारांसाठी दुमजली कामगार भवन करवीर तालुक्यात बांधून व भोजनाची व्यवस्था करून सर्व समावेशक तळागाळातील सर्वसामान्य बांधकाम कामगारांच जीवनमान उंचावण्याचे संजय सुतार यांचे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोदगार करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांनी काढले.


राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष संजय सुतार ( चाफोडीकर ) यांना सर्व संचालक व बांधकाम कामगारांच्यावतीने बोलेरो गाडी प्रदान करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

फुलेवाडी येथे हा प्रदान सोहळा पार पडला. यावेळी आमदार पी. एन. पाटील. यांनी स्वत: गाडी चालवून सुतार यांच्याकडे सुपूर्द केली. गाडी प्रदानप्रसंगी जिल्हाध्यक्ष शिवाजी कवठेकर, राजीवजी सूतगिरणीचे संचालक चेतन पाटील, पंचायत समिती उपसभापती विजय भोसले, राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटनेचे सर्व संचालक, संचालिका व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545