कोल्हापूर प्रतिनिधी : दोन दिवस अखंड रिपरिप पावसाची सुरू आहे. जेव्हा अतिपाऊस असतो, तेव्हा विशेषत: भाजीपाला तातडीने विक्री करावा लागतो, अन्यथा तो सडून जाण्याची भीती असते. जास्त दराने दराने भाजीची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आज २० रुपये किलोपर्यंत फळभाजी,भाजीपाला विकावा लागला.
लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, उपनगरातील भाजी मंडई पावसामुळे मंडईत तुलनेने गर्दी अत्यल्प होती. विक्रेत्यांना कमी दरात का असेना दर कमी करावे लागले.
भेंडी, दोडका, पांढरी वांगी, उसावरील शेंग आदींचे दर तर २०/३० रुपये किलोपर्यंत आले होते. पाऊस संततधार असल्याने ग्राहक मंडईत नाही. फळभाज्या दर (प्रतिकिलो रुपये) टोमॅटो १५/२,हिरवी टोमॅटो (भाजीसाठी) १०,ढब्बू २०,पडवळ १० रुपयाला एक नग,शेवगा शेंग २० रुपये पेंडी, हिरवी वांगी २०,काळी वांगी १०,बिनिस ४०,काटे काकडी २०,भेंडी ३०,कोबी १० रुपये, एक नगफ्लॉवर २० रुपयाला, एक नगभोपळा फोड २०,मक्का कणीस १० रुपयाला एक नग,हिरवा वाटाणा ३०,बंदरी गवारी ४०,जवारी गवारी ८०,दूधी भोपळा १० रुपयाला एक, नगकारली २०,सुरण गड्डा ८०,आळू गड्डा ८०,कांदा २०,इंदूरी बटाटा ३०,कच्ची केळी ३० रुपये डझनलाल बीट ५ रुपये, नगमुळा १० रुपये, नगकाळा घेवडा ३०,पापडी शेंग ३०,बेळगावी गाजर ३०,हिरवी मिरची १० रुपये