कोल्हापूर प्रतिनिधी : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे आज सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. युनियनचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात येत आहे.

ग्रामसेवकांमधून ग्रामविकास अधिकारी पदी रखडलेली पदोन्नती तात्काळ देण्यात यावी, ग्रामविकास अधिकारी पदावरून विस्ताराधिकारी (ग्रा.प)व विस्ताराधिकारी (कृषी) पदाची पदोन्नती तात्काळ देण्यात यावी,निलंबन कालावधी संवेत धरण्यात यावा,कंत्राटी ग्रामसेवकांना त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होताच त्यांना कायम आदेश द्यावेत,सुधारित आश्वासित प्रगती योजना १०:२०:३० चे लाभ तात्काळ द्यावेत,वैद्यकीय बिले बजेट सह त्वरित मिळावीत,राजकीय दबावापोटी ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येऊ नये यासह विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले.
या उपोषणात बाबासाहेब कापसे,आनंदा तळेकर,लता कणसे,शिवाजी वाडकर,आर डी.कुंभार,गौतम कांबळे, राहुल सिदनाळे आदींसह युनियनच्या पदाधिकारी व सभासदांनी सहभाग नोंदवला.