कोल्हापूर प्रतिनिधी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल दुपारपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे आज (रविवारी) सकाळी ११ च्या सुमारास धरणाचा सहा नंबरचा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला.
या दरवाजातून १४२८ क्युसेक्स तर विजगृहातून १६०० क्युसेक्स असा एकूण ३०२८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. गेल्या चोवीस तासांत 79 मीमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर 3913 भीमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.