पंचगंगा स्मशानभूमीसाठी सतेज पाटील, जयश्री जाधव यांच्या आमदार निधीतून प्रत्येकी ५० लाख

कोल्हापूर : येथील पंचगंगा स्मशानभूमी येथील भौतिक सुविधा व विस्तारीकरण संदर्भामध्ये आज आमदार सतेज पाटील यांनी आज आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील व महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत आज भेट देऊन पाहणी केली. यानंतर पंचगंगा स्मशानभूमीच्या विकासासाठी आमदार सतेज पाटील व आमदार जयश्री जाधव यांनी आमदार विकास निधीतून प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याचे जाहीर केले तर महापालिकेने एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी सूचना आमदार सतेज पाटील यांनी महापालिकेस दिली.

काही दिवसापूर्वी आमदार जयश्री जाधव यांनी स्मशानभूमीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी स्मशानभूमीच्या दुरुस्ती करण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम अर्धवट राहिले. या पार्श्वभूमीवर आज महापालीकेच्या अधिकाऱ्यांसोबत याठिकाणी आमदार सतेज पाटील यांनी भेट देऊन देऊन पाहणी केली.

यावेळी महापालिकेच्या ऑफिस शेजारील ९ गुंठे जागेमध्ये नवीन २४ बेड्चे स्मशानभूमी शेड उभारण्याचे ठरले. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात १२ बेड्ससाठीचे शेड उभारण्यात येणार आहे. यासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांच्या आमदार फंडातून प्रत्येकी ५० लाख असे १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, सध्याच्या शेड दुरुस्ती, स्मशानभूमी ते बुधवारपेठ पर्यंतचा रस्ता रुंदीकरण व सुशोभिकरण करणे, रस्त्यावर स्ट्रीट लाईट, स्मशान भूमीतील पाण्याचा निचरा, स्वच्छतागृह आदी सुविधांसाठी महानगरपालिकेकडून रु.१ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केल्या.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे सुनील मोदी, शारंगधर देशमूख, निलोफर आजरेकर, अनिल निकम, धनंजय सावंत, शशिकांत पाटील, अमित पाटील, शशिकांत भांदिगरे, दिग्विजय मगदूम, श्रीधर गाडगीळ तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.