वारणा बँकेच्या सभासदांना १० टक्के लाभांश देणार : निपुण कोरे

वारणानगर (प्रतिनिधी) : श्री वारणा सहकारी बँकेची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन निपुण कोरे होते. जनरल मॅनेजर प्रकाश डोईजड यांनी अहवाल सालातील दिवंगत मान्यवर व सभासदांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पद्माकर सार्दळ यांनी स्वागत केले.

बँकेचे व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्वेश निपुणराव कोरे यांचा सत्कार वारणा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रतापराव पाटील यांच्या हस्ते झाला. व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य व्हा. चेअरमन उत्तम पाटील व अँड. महादेवराव चावरे यांचा सत्कार बँकेचे चेअरमन निपुण कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बँकेचे चेअरमन निपुण कोरे म्हणाले, सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती साधत बँकेच्या ठेवी रु. ९८९.१२ कोटी व एकूण कर्जे रु. ६२८.०५ कोटी झाली आहेत. बँकेचा मिश्र व्यवसाय रु. १६१७.१८ कोटी, तर सीडी रेशो ६३.५० टक्के इतका आहे. तसेच रु. १५.४५ कोटी झाला. सभासदांना गतवर्षी १० टक्के लाभांश देण्याची संचालक मंडळाने शिफारस केली असून त्यास मान्यता मिळावी, असे निपुण कोरे यांनी सांगितले. सभासदांनी मान्यता दिल्यानंतर लाभांशाची रक्कम खात्यावर जमा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पद्माकर-सार्दळ यांनी नोटीस वाचन व विषयवार ठराव मांडले. त्यास सभासदांनी मंजुरी दिली.

बँकेच्या एकूण ३९ शाखा+१ यांनी सांगितले. एक्स्टेंशन काँटर अशा ४० शाखा कार्यरत आहेत. बँकेने सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळविलेला आहे. सर्व शाखा संगणीकृत व अद्ययावत असून, कोअर बँकिंग प्रणालीशी जोडलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने रूपे डेबिट कार्ड, ए.टी.एम. पॉझ, ई-कॉमर्स व मोबाईल बँकिंग, आएएमपीएस त्याचबरोबर आर. टी. जी. एस./एन. ई. एफ. टी. सारख्या फंड्स ट्रान्सफर व एस. एम. एस.,मिस कॉल अलर्ट, यूपीआय सुविधा या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. बँकेचे डाटा सेंटर कोल्हापूर या इमारतीमध्ये आहे. अहमदनगर येथे डी. आर. साईट कार्यान्वित आहे. तसेच मल्टिस्टेट दर्जा घेण्याकरिताची जरूर ती कार्यवाही सुरू असून, याची, लवकरच पूर्तता होईल, असेही कोरे यांनी सांगितले.

सभेस बँकेचे व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्वेश कोरे, माजी ज्येष्ठ संचालक प्रमोद कोरे, बसवेश्वर डोईजड, वारणा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे व्हा. चेअरमन एच. आर. जाधव, डेप्युटी जनरल मॅनेजर पी. टी. पाटील उपस्थित होते.सूत्रसंचालन चोपडे यांनी केले. बँकेचे व्हा. चेअरमन उत्तम पाटील यांनी आभार मानले.