‘गोकुळला’ सर्वतोपरी सहकार्य करु : ना. राधाकृष्ण विखे-पाटील

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री पदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच ना. राधाकृष्ण विखे-पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता वारणानगर येथे कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी गोकुळ परिवारामार्फत त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार विनय कोरे व इतर मान्‍यवर उपस्थित होते.

                                                                  

यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्‍हणाले की ‘गोकुळ’ ही संस्था सहकारातील दुग्‍ध व्यवसायामध्ये शिखर संस्‍था असून. गोकुळ दूध संघाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने दुग्ध व्यावसायामध्ये केलेली प्रगती दूध उत्पादकाच्या उत्कर्षाला चालना देणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले व गोकुळच्या विविध योजनाचे कौतुक करून गोकुळच्या प्रलंबित प्रस्तावाच्या मंजुरीस सहकार्य करू असे आश्वासन दिले.

याभेटी प्रसंगी संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी संघाच्‍या कार्यक्षेत्रामध्‍ये राबिवल्‍या जात असलेल्‍या गोकुळच्‍या विविध योजनांची व उपक्रमाची माहिती दिली. गोकुळच्‍या विविध प्रश्‍नावर चर्चा केली.दुग्‍ध व्‍यवसायासमोर असणा-या अडी-आडचणीबाबत व संघाच्‍या प्रलंबित असणा-या विविध प्रस्‍तावांना सहकार्य करण्‍याबाबत चर्चा केली व गोकुळ दूध संघास भेट देण्याचे आमंत्रण दिले.