माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ‘हर घर तिरंगा, हर घर संविधान’

कोल्हापूर (प्रतिनिधी) माणगाव हे गाव छ. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. भारताचा ७५ वा अमृतमहोत्सवा निमित्त माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. हर घर तिरंगा व हर घर संविधान माणगाव गावातील प्रत्येक कुटुंबाला तिरंगा ध्वज व आपल्या भारताचे संविधान प्रत दिली जाणार आहे, अशी माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली.


प्रामुख्याने अनिष्ट विधवा कुप्रथा बंधीचा ठराव माणगाव ग्रामपंचायतीने केला असून या ठरावाची अंमलबजावानी १ मे पासून गावातील ग्रामस्थांनी केली आहे. विधवा महिलांना मान सन्मान मिळावा या हेतूने माणगाव ग्रामपंचायतीने जाहीर केल्या नुसार १४ व १५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रतीकात्मक सरपंच व उपसरपंच म्हणून गावातील विधवा महिलांची निवड करून त्यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करणेत येणार असून त्या दिवशी ग्रामसभेचे अध्यक्षपदी त्याच महिलेच्या हस्ते करणेत येणार आहे. 8 ऑगस्ट च्या ग्रामसभेमध्ये चिठ्या द्वारे सोडत काढण्यात आली त्या मध्ये अनुक्रमे १४ ऑगस्ट २०२२ रोजी प्रतीकात्मक सरपंच म्हणून वंदना गौतम जाधव व प्रतीकात्मक उपसरपंच म्हणून प्राजक्ता संतोष पोवार तसेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रतीकात्मक सरपंच म्हणून सपना सुनील पाटील यांची सोडत द्वारे निवड करण्यात आलेली आहे.


तसेच माणगाव गावातील वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या गावातील ७५ जेष्ठ नागरिकांचा यथोचित मान सन्मान ग्रामपंचायतीच्या वतीने करणेत येणार आहे. तसेच १३ ऑगस्ट २०२२ रोजी गावातील माझी सैनिकांच्या हस्ते हायस्कूल, कुमार विद्या मंदिर, कन्या व उर्दू विद्या मंदिर. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी ध्वजारोहन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर १४ ऑगस्ट २०२२ व १५ ऑगस्ट २०२२ रोजीही त्याच ठिकाणी गावातील विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे.

  गावातील युनियन बँक ते शिव तीर्थ पर्यंतच्या सहाशे मीटर मार्गावर दुतर्फा तिरंगा ध्वज फडकाऊन रोडच्या कडेला असणा-या भिंती वरती तिरंगा लाईट इफेक्ट्स करणेत येणार आहे. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, ग्रामपंचायत इमारत, शिवतीर्थ या ठिकाणी तिरंगा विद्युत रोषणाई करणेत येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्त गावातील ग्रामस्थांनी आप आपल्या घरा समोर रांगोळी घालावी याबाबत ग्रामस्थांना आवाहन केले आहे. 

अशा अनेक विविध उपक्रमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने साजरा केला जाणार आहे असेही मगदूम यांनी सांगितले.

🤙 8080365706