चिखली पूरग्रस्तांचा महामार्ग अधिकाऱ्यांना घेराव


प्रयाग चिखली (वार्ताहर) : अवघ्या दोन-तीन दिवसाच्या पावसाने महापूर येतो आणि आमचे सर्वस्व हिरावून नेतो शेती कुजते, व्यवसाय बुडतो रोजगार संपतो, जनावरे मरतात,… वर्षानुवर्षे चिखली परिसरातील पूरस्थिती गंभीर होण्याला कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गाचा भरावाच कारणीभूत असून या भराव्याबाबत निर्णायक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात ग्रामस्थ आहेत. त्याच दृष्टीने आज येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन अधिकाऱ्यांना महामार्गावरील रेडे डोह ठिकाणी अक्षरशः धारेवर धरले. आणि तितक्याच काकुळतीने कोल्हापूर रत्नागिरी भराव्याला पुल टाईप मोऱ्या बांधून चिखलीकरांची कुजणारी शेती वाचवावी पर्यायाने येथील शेतकऱ्याला वाचवावे अशी हात जोडून विनंती ही केली.


यावेळी चिखलीचे माजी सरपंच केवलसिंग रजपूत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देताना चिखली परिसरात पाच नद्यातून जमा होणाऱ्या पुराच्या पाण्याला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचा भरावा जणू एक बांधच ठरतो पाणी ओसरले तरी या भराव्याला तटून पाणी अनेक दिवस चिखलीकर यांच्या शेतामध्ये साठून राहते आणि येथील शेती पूर्णपणे कुजते हा अनेक वर्षांचा अनुभव असल्याचे सांगून या भराव्याला ठिकठिकाणी मोऱ्या पाडल्या तर आमची शेती कुजणार नाही अशी सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना दिली. तसेच महामार्गाच्या भरावयाच्या चिखलीकडील बाजूस पुराचे तुंबलेले पाणी दाखवत सध्याच्या मोऱ्यांच्या अरुंद नळ्यांमध्ये कचरा अडकल्याने पाणी सप्लाय होत नसल्याचेही दाखवून दिले आणि अधिकाऱ्यांना मुद्दा त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला.


यावेळी कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग भराव, कसबा बावडा रस्त्याचा भराव आणि शिरोली हायवेचा भराव हे भरावे च महापुराला कारणीभूत ठरत असल्याचेही निक्षूण सांगितले
यावेळी नॅशनल हायवे चे व्ही एन पाटील तसेच कृष्णा जोशी या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील भराव्याला रेडेडोह ठिकाणी तसेच तसेच ठिकठिकाणी कमान मोऱ्यांचे बांधकाम होणे गरजेचे असल्याचे मान्य केले आणि तशी कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी ग्रामस्थांना दिले
दरम्यान याकरिता राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती महत्त्वाची असून तसे नेत्यांनाही साकडे घालू असे ग्रामस्थांनी यावेळी बोलून दाखवले
यावेळी चिखलीचे बटूसिंग रजपूत, धनाजी चौगले वडणगेचे सरपंच सचिन चौगले, उत्तम चौगले, आंबेवाडी चे -आशिष पाटील मंडल अधिकारी श्री काटकर, विलास तोडकर तलाठी श्रीकांत नाईक व परिसरातील पूरग्रस्थ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545