नवी दिल्ली : खरी शिवसेना कुणाची यासाठी एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट हे आज निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर करत आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आठवड्यांची वेळ मागितली आहे.

कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने हा वेळ मागितला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येईपर्यंत आयोगाने निर्णय घेऊ नये, अशीदेखील विनंती ठाकरे गटाने केल्याचे समजते.

शिवसेनेतून 40 आमदार आणि 12 खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर, शिंदे गटाने पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव यावर दावा सांगितला आहे. तर ठाकरे गटाकडून हा दावा फेटाळून लावत निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेतील वादावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.