घर तिथे शिवसेना सभासद नोंदणीस गांधीनगर येथून प्रारंभ

गांधीनगर : घर तिथे शिवसेना सभासद नोंदणीस गांधीनगर येथून प्रारंभ झाला. करवीर पूर्व भागात शिवसेना सभासद नोंदणीस गांधीनगर व्यापार पेठेतून सुरवात करण्यात आली.

यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, घराघरात जाऊन शिवसेना सभासद नोंदणी सुरू केली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या समाजभिमुख कामाची माहिती व्यापारी वर्गास देण्यात आली.सध्या चालू असलेल्या घडामोडींबाबत व्यापारी वर्गाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आम्हाला सहकुटुंब शिवसेना सभासद करून घ्या अशी मागणीही केली.

यावेळी उंचगाव, गांधीनगर, गडमुडशिंगी, वळीवडे सह पूर्व भागात घर तिथे सभासद ही मोहीम राबविण्यात आली.करवीर पूर्व भागातून जास्तीतजास्त सभासद करण्याचे नियोजन करण्यात आले. ही नोंदणी सण २०२२ ते २०२४ या सालाकरिता सभासद नोंदणी असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, शाखाप्रमुख दिपक अंकल, उपशाखाप्रमुख सुनिल पारपाणी, दिपक फ्रेमवाला, किशोर कामरा, सुनील बदलाणी, जितु चावला, राजेश सचदेव, शंकर चावला, श्रीकांत सावंत, नमेश चव्हाण आदी उपस्थित होते.