प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी सोनाली कोप्पा यांची निवड

उंचगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामीण, जीवन्नोती अभियानांतर्गत करवीर पंचायत समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी उंचगाव मणेरमाळ येथील तेजस्विनी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. सोनाली प्रकाश कोप्पा यांची बहुमताने निवड करण्यात आली.

या प्रभागामध्ये उंचगाव, गांधीनगर आणि सरनोबतवाडी येथील सर्व महिला स्वयंसहाय्यता समूहांचा समावेश होतो. यासाठी सर्व पदाधिकारी CRP आणि सर्व समूह यांची मोलाची मदत झाली.

अध्यक्षपदी निवड झाल्याबददल सौ. सोनाली प्रकाश कोप्पा यांचे करवीर पंचायत समिती, उंचगाव ग्रामपंचायत, सर्व सदस्य स्वयंसमूह, CRP आणि ग्रामस्थांकडून कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले.