आ. ऋतुराज पाटील यांच्याहस्ते उचगावात बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

उचगाव : बांधकाम कामगारांनी आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यावी. त्यांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले. उचगाव येथे 184 बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर 12 लाखांच्या निधीतून केलेल्या विकासकामांचे उदघाटन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्या बांधकाम व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. अनेक जण ठेकेदार होत आहेत, मात्र कामगार मात्र कमी पडत आहेत. अशा वेळी या बांधकाम कामगाराची काळजी घेणे महत्वाचे आहे. कामावर असताना कामगारांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून सेफ्टी किटअत्यावश्यक असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

गेल्या अडीच वर्षे काळात महाविकास आघाडी सरकारने समाजाच्या सर्व घटकातील लोकांना न्याय देण्याची आणि सहकार्य करण्याची भूमिका शासनाने घेतली. बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून बांधकाम कामगाराना आधार देण्याचा प्रयत्न केला असल्याचे पाटील यांनी सांगितले

दरम्यान, उचगाव मध्ये 200 कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. लवकरच ही संख्या १००० च्या पुढे गेला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन आ. ऋतुराज पाटील यांनी केले.

विकासकामांचे उदघाटन

उचगाव येथे डोंगरी विकास निधीतून करण्यात येणाऱ्या सुमारे 12 लाख रुपयांच्या गटर्सचे उदघाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या 15 वा वित्त आयोग 17 लाख रुपये निधीतून कचरा व्यवस्थापनासाठी 2 टेम्पो व इलेक्ट्रिक घंटा गाडीचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी पैलवान मधुकर चव्हाण, गणेश भोसले, सतीश भोसले, चंद्रकांत वळकुंजे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच मालुताई काळे, माजी सरपंच गणेश काळे, उपसरपंच सुभाष निगडे, ग्रा. प. सदस्य पैलवान मधुकर चव्हाण, कीर्ती मसुटे, सचिन देशमुख, मधुकर चव्हाण, प्रदीप बागडी, महेश खांडेकर, सचिन गाताडे, दीपक काळे, माजी जि प सदस्य मंगलताई वळकुंजे, माजी तालुका पंचायत समिती सदस्य सुनील पोवार, माजी सरपंच अशोक निगडे, माजी सरपंच कावजी कदम, दिनकर पोवार, सतीश मुसळे, जयसिंग ढेकळे, संदीप पाटील, दत्ता यादव,राजू काळे,रवी काळे,विनायक जाधव,विराग करी,सुरेश चव्हाण,मधुकर चौगुले, विजय गुळवे,प्रकाश ढेकळे,गौरी मुसळे,गणेश भोसले, यांच्यासह लाभार्थी महिला व नागरिक उपस्थित होते.

🤙 9921334545