कोल्हापूर : पोस्ट कार्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी २१ हजार तिरंगा ध्वज पोस्ट खात्याने उपलब्ध करून दिल्याची माहिती अधीक्षक डाक विभाग कोल्हापूरचे अर्जुन इंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे देशभरातील पोस्ट कार्यालयांमधून जवळपास ८७ लाख तिरंगा तिरंगा ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत कोल्हापूर डाक विभागान जिल्ह्यातील ५६५ पोस्ट कार्यालयांमध्ये तिरंगा ध्वज विक्री साठी उपलब्ध करून दिल्याची माहिती पिंगळे यांनी दिली. आज अखेर एक हजार ध्वजांची विक्री झाली आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सूध्दा पोस्टाच्य माध्यमातून सहा स्टाँल उभारले असून गडिंग्लज आणि गारगोटी या ठिकाणी हर घर तिरंगा जागृतीसाठी रॅली ही काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली ज्या ग्राहकांना घरपोच तिरंगा ध्वज उपलब्ध करायचा झाल्यास अशा ग्राहकाने ई पोस्ट द्वारे तिरंगा ची नोंदणी करू शकतात. तीन बाय दोन आकारात हा तिरंगा असून याची किंमत पंचवीस रुपये इतकी ठेवण्यात आल्याची माहिती पिंगळे यांनी दिली.