कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे ‘न्यू इरा ऑफ मॅनुफॅक्चअरिंग’ या विषयावर एक आठवड्याची आंतरराष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी देश- विदेशातील तज्ज्ञ आणि अनुभवी संशोधक, प्राध्यापक, उद्योजक मार्गदर्शन लाभले.

कार्यशाळेत मॅनुफॅक्चअरिंग क्षेत्रामधील नवीन संधी, ऑटोमेशन टेक्नोलोंजि, कॅड झाइन, मॉडेलिंग, इंडस्ट्री ४.0, मायक्रोफॅब्रिकेशन , आदी विषयावर देशातील नामांकित शिक्षण संस्थामधील तसेच इटली, रशिया, अमेरिका येथील नामांकित विद्यापीठातील संशोधक, प्राध्यापक व उद्योजक यांनी मार्गदर्शन केले.
इटली येथील डॉ. डोरियाना ऍडओना यांनी मशीन लर्निंग या विषयावर, रशियाच्या डॉ. निकिटिन यांनी ऑटोमेटेड टेकनॉलॉजी, डॉ सत्वशील पवार यांनी पेरोवस्कीटे सोलर सेल बद्दल, संदीप पाटील यांनी कॅड विषयावर, डॉ. मिलिंद आकारते यांनी ३ डी प्रिटिंगमधील संधीबद्दल, डॉ अशोक पांडे आणि डॉ सुहास मोहिते यांनी एम .इ .एम .एस या विषयावर, डॉ. प्रशांत अंबड आणि डॉ. राधारमन मिश्रा, डॉ. अम्लाना पांडा यांनी मॅनुफॅकाचुरिन्ग सत्रातील इंडस्त्री ४. एनर्जी स्टोरेज दिवस आणि इनकॉलॉजि या विषयवर मार्गदर्शन केले
कार्यशाळेसाठी देशातील व देशाबाहेरील संशोधक आणि प्राध्यापक अशा सुमारे ५०० हुन अधिक जणांनी सहभाग नोंदवला होता, कार्यशाळेसाठी मेकॅनिकल डिपार्टमेंट चे विभाग प्रमुख डॉ. सुनील रायकर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. विराज पसारे, प्रा. दीपक सावंत, प्रा. योगेश चौगुले, प्रा. शुभदा वारके, प्रा.निलेश मोहिते, प्रा .उत्कर्ष पाटील, प्रा. अभिजित मटकर, प्रा.महेश शिंगे, प्रा.पंकज नंदगावे व अन्य प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.
कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
