कोल्हापूर : भारत सरकारच्या (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय) अंतर्गत असणाऱ्या नेहरु युवा केंद्र,कोल्हापूर,संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महिला महाविद्यालय,क बीड यांच्या संयुक्त विद्यमाने “आझादी का अमृत महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एस. भोसले यांनी “देशभक्ती”याबाबत मनोगत व्यक्त केले.”आझादी का अमृत महोत्सव – 13 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा”बाबत गणेश भोसले यांनी माहिती दिली. तसेच संस्थेचे विश्वस्त मेणसे, सरपंच दिनकर गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी गावातून 50 युवतींसोबत रॅली काढून 25 घरांना भेटी देवून “हर घर तिरंगा” कार्यक्रम”स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” घरोघरी पोहोचविण्यात आला. भारत मातेच्या जयघोषात परिसर ऊर्जादायी बनला.

यावेळी नेहरु युवा केंद्र कोल्हापूरचे सहाय्यक गणेश भोसले, सरपंच दिनकर गावडे, प्राचार्या. डॉ. एस. एस.भोसले, विश्वस्त मेणसे, प्रा. सरदार पाटील, ग्रामस्थ व युवती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोबीन नदाफ यांनी केले.