मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

औरंगाबाद : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात एकनाथ शिंदेनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं. पण मुख्यमंत्री शिंदेंचा हा दौरा आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार औरंगाबाद पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी विकास कामांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महाराष्ट्र दौरा करत राज्यातील विविध भागांना भेट दिली. नुकतंच एकनाथ शिंदेनी औरंगाबाद जिल्ह्याचा सुद्धा दौरा केला होता. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात एकनाथ शिंदेनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं. पण मुख्यमंत्री शिंदेंचा हा दौरा आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार औरंगाबाद पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रातल्या विविध भागात दौरा करत विकास कामांचा शुभारंभ करत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी औरंगाबादमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रात्री १० नंतरही लाऊड स्पीकर वरून भाषण केलं होतं. आनंद कस्तुरे यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात या संबधी तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं असं या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळेच आनंद कस्तुरे यांनी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी केली आहे.

🤙 9921334545