कोल्हापूर जिल्ह्यातील ६ पालिकांसह राज्यातील ९२ पालिकांची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत मोठे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. यात जयसिंगपूर, कुरुंदवाड, पेठवडगाव, कागल, मुरगूड, गडहिंग्लज या नगरपालिकांचा समावेश आहे.

या निवडणुकांसाठी कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना जारी करता येणार नसल्याचे ही सुप्रीम कोर्टाने म्हटले. राज्य निवडणूक आयोगाने या निर्देशांचे पालन न केल्यास त्याला कोर्टाची अवमानना केली, असे समजण्यात येईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

या निवडणुकांसाठी कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना जारी करता येणार नसल्याचे ही सुप्रीम कोर्टाने म्हटले. राज्य निवडणूक आयोगाने या निर्देशांचे पालन न केल्यास त्याला कोर्टाची अवमानना केली, असे समजण्यात येईल, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

🤙 8080365706