कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या अंतिम वर्षाच्या ३० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यामध्ये निवड झाली आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

डी. वाय. पाटील महाविद्यालयाचा आर्किटेक्चर विभाग गेल्या ३८ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर म्हणून ओळखला जातो. या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जगभरात उत्कृष्ट आर्किटेक्ट म्हणून नावाजलेले आहेत. उतम शिक्षणाबरोबरच शैक्षणिक सत्र संपल्यानंतर नोकरीसाठी मिळणाऱ्या संधी देखील तितक्याच महत्वाच्या ठरतात. म्हणूनच आर्किटेक्चर विभागातर्फे बी. आर्कच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे पोर्टफोलिओ, शैक्षणिक गुणवत्ता, मुलाखत, ग्रुप डिस्कशन इ.विविध निकष निवडीसाठी लावण्यात आले होते. सदरच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभागी झालेल्या सर्व ३० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
विविध कंपन्यामध्ये निवड झालेल्या या विद्यार्थ्याना बुधवारी विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या या सत्कार समारंभाला डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य संतोष कुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, आर्कीटेक्चर विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर. जी. सावंत, विभागप्रमुख इंद्रजीत जाधव, टीपीओ प्रा. सुदर्शन सुतार, असिस्टट टीपीओ मकरंद काइंगडे, समन्वयक प्रा. संतोष आळवेकर, प्रा. पूजा जिरगे आदी उपस्थित होते.
कामातून ओळख निर्माण करा: आमदार ऋतुराज पाटील*
आर्कीटेक्ट हा सर्जनशील असल्याने आपल्या व्यवसायाप्रती समर्पित वृत्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर या कामाशी निष्ठा व सतत नवे शिकण्याची व नवे काहीतरी घडवण्याची धडपड असेल तरच या क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करता येते. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्कीटेक्चर मधून अशाचप्रकारचे उत्तम आर्कीटेक्ट घडवण्याचे काम गेल्या ३८ वर्षांपासून सुरु आहे. आज आपल्याला उत्तम फर्ममध्ये नोकरीची संधी मिळाली आहे, तेवढ्यावरच समाधान न मानता इतरांना आपल्याकडे काम करण्याची संधी देता येईल असे काम करावे. जिथे काम कराल तिथे आपल्या कामातून आपली ओळख निर्माण करा असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी केले.
आर्किटेक्चरचे समन्वयक प्रा. संतोष आळवेकर, प्रा. पूजा जिरगे व महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख सुदर्शन सुतार यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष सतेज डी.पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे प्रोत्साहन व कार्यकारी संचालक डॉ.अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ.संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, वास्तुशास्त्रविभाग अधिष्ठाता प्रा. आर. जी. सावंत, विभागप्रमुख प्रा. आय. एस. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले .
