कलाकरांनी सानुग्रह अनुदानासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातून 280 पात्र एकल कलाकारांची निवड करून सांस्कृतिक कार्य विभागास 31 मार्च 22 रोजी यादी देण्यात आली होती. त्यानुसार 25 जुलै 2022 रोजी सांस्कृतिक खात्याने या सर्व कलाकारांच्या खात्यावर प्रत्येकी रुपये पाच हजार जमा करण्यात आलेले आहेत. निवड झालेल्या ज्या कलाकारांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झाली नसल्यास त्या कलाकारांनी त्वरित समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केले आहे.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण राज्यासह देशात लॉक डाऊन लागू होता. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने कलाकारांना सुमारे दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित राहावे लागले होते .त्यामुळे अशा कलाकारांना आर्थिक सहाय्य म्हणून रुपये पाच हजार प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने कलाकारांकडून अर्जांची मागणी करण्यात आली होती.

जिल्ह्यातील 280 कलाकारांची निवड करण्यात आली यामध्ये तालुके निहाय कलाकारांचा आकडा असा आहे आजरा 9 भुदरगड 5 चंदगड 4 गगनबावडा 8 गडहिंग्लज 2 हातकणंगले 36 कागल 9 करवीर 32 राधानगरी 146 शाहूवाडी 3 शिरोळ 16 अशा एकूण 280 पात्र एकल कलाकारांची निवड करण्यात आली आहे.