हुपरी-कोल्हापूर मार्गावरील जीवघेणे खड्डे त्वरित मुजवा; करवीर शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : हुपरी कोल्हापूर रस्त्यावर उचगाव हायवे पूल ते गडमुडशिंगी कमान मार्गावर मोठं मोठे खड्डे पडले असून येथे दोन दिवसापूर्वी खड्यामध्ये पडून तब्बल बारा अपघात झाले असून असे छोटे मोठे अपघात रोज ह्या ठिकाणी होत आहेत. मोठ्या प्रमाणात अपघात होणाऱ्या ह्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती किंवा नवीन रस्ता करावा अन्यथा करवीर शिवसेनेच्या वतीने रस्त्यातील खड्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे फलक लावण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला.

मणेर मळा वळण ते हायवे पूल या भागामध्ये रस्त्याला दोन्ही बाजूला गटार नसल्याने तेथे रस्त्याच्या भागात आधीच सखल असल्याने तेथे इतर पाणी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ता मोठ्या प्रमाणात खराब होऊन मोठं मोठे खड्डे पडलेले आहेत आज या भागातून हुपरी, पट्टणकोडोली, गडमुडशिंगी तसेच कर्नाटकात जाण्यासाठी छोटी मोठी वाहनासह रोज हजारो प्रमाणात मोठी वाहतूक आहे स्कुल बसेस रिक्षा सूत मिल्सच्या कंटेनर या मोठया वाहनासह प्रचंड मोठ्या रहदारीसह असलेल्या ह्या रस्त्याची उचगाव हायवे पूल ते गडमुडशिंगी कमान अक्षरशः चाळण झाली आहे. तसेच दोन्ही बाजूच्या काही ठिकाणी गटर्स झाली असून तीही कचऱ्याने तुडुंब भरलेली आहेत. यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांना देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी कोल्हापूर- हुपरी राज्यमार्ग हा रस्ता सम्पूर्ण डांबरीकरण करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. हा नवीन रस्ता करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटर्स करून रस्त्यावर पाणी साचू नये अशा पध्दतीने  नवीन रस्ता करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. तोपर्यंत  ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत तेथे तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून ते खड्डे मुजवून घेऊ तसेच ज्या ठिकाणी गटारी आहेत त्याही साफ करून घेऊ असे आश्वासन करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपतालुकाप्रमुख दिपक पाटील, उपशाखाप्रमुख कैलास जाधव, भूषण चौगुले, नितीन गानबोटे, अजित चव्हाण, संतोष चौगुले, प्रफुल्ल घोरपडे, विरेंद्र भोपळे, सागर पाटील, सुरज इंगवले, बाबुराव पाटील आदी उपस्थित होते.
🤙 9921334545