कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे रविवारी निधन झाल्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील-दानवे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज आमदार पाटील यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, संजयकाका पाटील, उन्मेष पाटील, मनोज कोटक, खासदार रक्षा खडसे यांनीही आमदार पाटील यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी आईंच्या आठवणींना उजाळा दिला.