शिंदे गटात सामिल होण्यासाठी नगरसेविकेच्या पतीला जबर मारहाण

सांगली : (प्रतिनिधी) इस्लामपूर नगरपालिकेच्या नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार शिंदे यांना जबर मारहाण शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी  केली असून शिंदे यांचे  मारहाणीमध्ये त्यांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांना सांगलीच्या भारती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळी दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडले असता त्यांच्यावर  काही कार्याकारात्यानी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली.  दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप नगरसेविका प्रतिभा शिंदे यांनी केला आहे. शिंदे गटामध्ये सामील होण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक एकनाथ शिंदे गटाच्या समर्थकांकडून धमक्या देण्यात येत होत्या, मात्र आपण पती-पत्नी दोघांनी शिंदे गटात सामील होण्यास नकार दिल्याने हे मारहाण करण्यात आल्याचं नगरसेविका प्रतिभा शिंदे यांनी सांगितले आहे. तर या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून हल्लेखोरांचा लवकरच शोध घेऊन अटक केली जाईल,अशी माहिती इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे.

याआधी १४ जुलै रोजी भायखळा येथे शिवसैनिक बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्यावर हल्ला झाला होता.