सोलापूर : सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेतील अनेक आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. अशात आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेससाठीही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आता सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट आहे. त्यामुळे, राजकीय चर्चेला सोलापुरात उधाण आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता या भेटीनंतर ते आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करणार का? याकडेच जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे. राजन पाटील हे माजी आमदार आहेत. तर, बबनदादा शिंदे हे माढा मतदारसंघाचे आमदार आहेत.
