खा. माने यांच्या निवास्थानी शिवसैनिकानचा हल्लाबोल

बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले दिसले.  माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर कॉलनी येथील निवासस्थानावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्चा आज दुपारी बारावाजता धडकला.

मोर्चाला सुरवात होण्यापूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी धैर्यशील माने यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना जाधव  म्हणाले की, माने गटाने दोनवेळा गद्दारी केली आहे. यांची लायकी नव्हती, तरीही उद्धव ठाकरेंनी पाठीवर थाप मारली.  पदरचे पैसे खर्च करून निवडून आणले. दुसऱ्या गटात गेले हीच गद्दारी आहे. गद्दाराला क्षमा नाही. बाळासाहेब माने यांचे नातू असाल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असे आव्हानच केले. एक शिवसैनिक शंभर जणांना भारी असल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी कितीही बंदोबस्त आम्ही त्यांच्या निवास्थानी जाणारच अशी भूमिका यावेळी घेतली. शिवसैनिकांकडून खासदार धैर्यशील मानेंवर प्रश्नांची सरबत्ती केली.साहेबांचे काय चुकल ते सांगा असा सवाल त्यावेळे केला.