कागल (प्रतिनिधी) : कागलला कॉलेज शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी कागल आगारातून सोडली जाणारी गाडी म्हाकवेपर्यंत येत असल्यामुळे आणूर व बाणगेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी संभाजी ब्रिगेडकडे आल्यानंतर संभाजी ब्रिगेड आणूर शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगार प्रमुख सनगर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनाची दखल लवकरात लवकर घ्या, अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला.
निवेदनाची दखल घेऊन लवकरच समस्या सोडवली जाईल, असे आश्वासन आगर व्यवस्थापक सनगर यांनी दिले. त्याचबरोबर एसटी व्यवस्थापन व इतर विषयांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कुंभार, मारुती भोळे , दीपक माने , संतोष चौगुले ,सागर कोळी ,प्रवीण भोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते