कोल्हापूर (प्रतिनिधी) ; गेल्या अनेक दिवसापासून पाचगाववासीयांना पाण्याचा प्रश्न भेडसावत असलेल्या आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून मार्गी लागला आहे. आम. ऋतुराज पाटील यांनी पाचगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सविस्तर चर्चा केली .

. सोमवार पाचगाव परिसरातील नागरिकाना दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करण्याची ग्वाही प्रशासक डॉ. बलकवडे यांनी दिली. पाचगावसह आसपासच्या भागात महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. पाचगावसह आर.के.नगर, दिंडे नगर, अष्टविनायक नगर, गुलमोहर कॉलनी, भारत माता कॉलनी, प्रथमेश कॉलनी, तारा कॉलनी, सहजीवन सोसायटी, द्वारका नगर, शांतादुर्गा नगर, के.एम.टी कॉलनी, निगडे मळा, गणेश नगर, रेणुका नगर, हरी पार्क, चित्रनगरी आणि मोरेवाडी या भागात अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती .स्थानिकांना येणाऱ्या अडचणी, महापालिकेसमोरील तांत्रिक अडचणी या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या भागाची व्याप्ती मोठी असल्याने पाणी पुरवठा प्रश्न निर्माण होत असल्याने महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.सध्या पाचगावसह आसपाच्या भागाला पाच दिवस आड पाणी पुरवठा होतो. तो एक दिवस करण्यात यावा अशी सूचना आम. ऋतुराज पाटील यांनी केली. यावर प्रशासक बलकवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत तात्काळ याची अमंलबजावनीचे आदेश दिले. त्यनुसार येत्या सोमवारपासून पाचगांवला एक दिवस आड नियमित पाणी पुरवठा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीत पाचगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच डॉ. स्नेहल शिंदे, ग्रा. प. सदस्य प्रवीण कुंभार, संग्राम पोवाळकर, संदीप गाडगीळ, शिवाजी दळवी