नारायण राणेंची त्या याचिका बद्दल न्यायालयाकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खार येथील अधीश बंगल्याचा अनधिकृत भाग नियमित करून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात राणे यांनी नव्याने याचिका तयार केली आहे. या याचिकेवर न्या. रमेश धनुका यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

एकदा अर्ज नामंजूर झाल्यानंतर दुसऱ्यांदा अर्ज कसा केला जाऊ शकतो, यावर कायदेशीर तरतूद आहे का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. तसेच नवीन अर्जात नवीन मुद्दे मांडले आहेत का, असेही राणे यांचे वकील ॲड. शार्दुल सिंह यांना विचारले.

अधीश बंगल्याची मालकी असलेल्या आर्टलार्इन प्रॉपर्टीजमध्ये राणे यांची पत्नी आणि मुलगा नीतेश संचालक आहेत. त्यामुळे राणे यांचे येथे वास्तव्य असते. या आलिशान ११ मजली बंगल्यामध्ये नियमबाह्य काम झाले, असा आरोप मुंबई महापालिकेने केला आहे. पालिकेच्या वतीने राणे यांना यापूर्वी पाडकामाची नोटीस देण्यात आली होती; मात्र नंतर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संबंधित बांधकाम नियमित करण्यासाठी त्यांनी पालिकेकडे अर्ज केला, परंतु हा अर्ज पालिकेने नामंजूर केला.

🤙 9921334545