मुंबई (वृत्तसेवा) : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. 20 दिवस उलटून गेले आहे, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

मंत्रिपद मिळवून देण्यासाठी एका आमदाराला मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. राज्यमंत्रिमंडळाचा अजून विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावे यासाठी आमदार प्रयत्न करत आहे. पण मुंबईमध्ये एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराला 100 कोटी रुपये मागण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. एवढंच नाही तर आणखी 3 आमदारांनाही फसवण्याचा प्रयत्न झाला,