अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, न्याय न दिल्यास आत्महत्येचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्यावर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलेने आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

आपल्याला न्याय मिळवून दिला नाही आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही तर आपल्यासमोर जीवन संपवण्याशिवाय काहीच पर्याय नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

एका महिलेच्या ट्विटर अकाउंटवरून हे पत्र शेअर करण्यात आले आहे. मात्र, साकीनाका पोलिस स्थानकात याबद्दलची तक्रार दाखल करून घेण्यात येत नसल्याचा आरोपही त्या महिलेने केला आहे. मात्र, हे पत्र खरे आहे किंवा नाही हे अजून समजू शकलेले नाही.