कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने नवीन सरकार स्थापन केलं आहे. मात्र, सरकार स्थापनेनंतर लगेच कोल्हापूरच्या विकासात भर पडण्याचे सोडून मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या काळातील अनेक विकास कामांची मंजुरी थांबवली.

मुख्यमंत्री शिंदेंनी अनेक ठिकाणी आधीच्या सरकारने मंजूर केलेले निधी रोखले आहेत. आता शिंदेंनी कोल्हापूर महापालिकेसह कागल आणि मलकापूर नगरपालिकांना हि देण्यात आलेला निधीही रोखला. नगरपालिकांना देण्यात आलेला 15 कोटी 29 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने रोखला आहे. निधी रोखण्याचे जिल्हाधिकार्यांना आदेश देण्यात आले आहेत. ठाकरे सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित केलेल्या निधीचा आढावा घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. त्यानुसार महापालिका, नगरपालिकांचा निधी रोखला जात आहे. या आदेशापूर्वी ‘वर्क ऑर्डर’ झालेली असेल, तर मात्र हा निधी खर्च करता येणार आहे.
कोल्हापूर महापालिकेला मुलभूत सुविधांसाठी प्रत्येक पाच कोटी याप्रमाणे दोनवेळा एकूण दहा कोटीचा निधी दिला गेला. कागल नगरपालिकेला 3 कोटी 70 इतका निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी देण्यात आलेला. यासोबतच विशेष बाब म्हणून 1 कोटी 30 लाख निधी देण्यात आलेला. यासोबतच मलकापूर नगरपालिकेलाही २९ लाखांचा निधी दिला गेला. हा निधी थांबवण्याचे आदेश आता शिंदे सरकारने दिले आहे. दरम्यान, सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी निधी रोखण्याचा सपाटा लावला असून महाविकास आघाडीच्या अनेक विकास कामांना ब्रेक लावल्याने गती थांबणार.
