सरनोबतवाडी : सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील प्रताप भोसलेनगरात स्ट्रीटलाईट नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. अजून किती वर्षे अंधारात काढायची असा प्रश्न येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीला विचारला आहे. या परिसरात तातडीने स्ट्रीटलाईटची सोय करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत येथील नागरीकांनी सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, स्ट्रीटलाईटबाबत वेळोवेळी निवेदन देऊन देखील अजून स्ट्रीटलाईटची सोय करण्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. प्रताप भोसलेनगरला जवळ-जवळ १७ वर्षे होऊन देखील अजून ही स्ट्रीटलाईटची सोय केलेली नाही. तरी हा प्रश्न तातडीने सोडवावा. स्ट्रीटलाईटची सोय नसल्यामुळे ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूर शहरालगत सरनोबतवाडी हे गाव असून देखील अजून किती दिवस प्रताप भोसलेनगर स्ट्रीटलाईट विना वंचित राहणार लागणार आहे. याचा नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी लोक प्रतिनिधींनी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा.
निवेदनावर भाजपाचे ओबीसी सेलचे जिल्हा कार्यकारी सदस्य रूपेश परीट, प्रवीण शिंदे, आकाश माने, सर्जेराव पढे, गणेश सुतार, प्रवीण रोडगे, मनोज व्हणकडे आदींच्या सह्या आहेत.