प्रयाग चिखली ( वार्ताहर) : प्रयाग चिखली (ता. करवीर) परिसरातील पुराचे पाणी शुक्रवार सायंकाळ पासून ओसरू लागल्याने चिखली परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून शिवाय धास्ती कमी झाली. आज दिवसभरात सुमारे अर्ध्या फुटाने पुराचे पाणी ओसरले आहे.

शुक्रवार सायंकाळपासून शनिवारी दिवसभरात पावसाची उघडीप राहिली. दरम्यान प्रयाग चिखली आंबेवाडी गावातील लोकांचे स्थलांतर थांबले आहे. शिवारामध्ये पाणी असल्यामुळे शेती कामे वगळता दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरळीत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाची उघडीपिमुळे पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्यामुळे चिखली ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान शिंगणापूर बंधाऱ्याचा रस्ता वगळता प्रयाग चिखली गावात संपर्क करणारे सर्व रस्ते खुले आहेत.