पूरस्थितीत प्रशासनाला सहकार्य करा, शासन आपल्या पाठीशी : राजेश क्षीरसागर

प्रयाग चिखली (वार्ताहर) : प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरातील पूरस्थिती गंभीर होऊ नये याकरिता कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील रेडे डोह ठिकाणी पूल व मोरीचे बांधकामासाठी पाठपुरावा केला जाईल, मात्र सध्याच्या पूरस्थितीमध्ये ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी शासन आपल्या पाठीशी आहे, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले.

प्रयाग चिखली येथील पूरग्रस्त ग्रामस्थांना करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी या गावांची पूरस्थिती नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर यांनी भेट देऊन पाहणी केली .

यावेळी प्रयाग चिखली येथील पूरग्रस्त ग्रामस्थांच्या वतीने २०१९ सालच्या घर पडझड मदतीपासून साठ लोक वंचित राहिल्याबद्दल त्यांना न्याय मिळावा अशा आशयाचे निवेदन गोकुळचे संचालक एस. आर. पाटील यांनी राजेश क्षीरसागर यांना निवेदन दिले. तर पुनर्वासनासाठी आंबेवाडी गावात भूखंड मिळण्याबाबतचे निवेदन सरपंच सिकंदर मुजावर यांनी दिले.

दरम्यान, राजेश क्षीरसागर यांनी चिखली, आंबेवाडी येथील पूरस्थितीची माहिती घेऊन जिल्हा प्रशासनाला संभाव्य पूरस्थितीबाबत सूचना व आदेश दिले. तसेच ग्रामस्थांनी पुराची भीती न बाळगता जबाबदारीने प्रशासनाला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करून पूरस्थिती काळात शासनाच्या वतीने आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जातील असे सांगितले.

यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शितल मुळे -भामरे, गटविकास अधिकारी जयवंत उगले, तालुका आरोग्य अधिकारी जी.डी. नलवडे यांच्यासह शासनाचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी होते.

🤙 9921334545