राज्यात पेट्रोल, डिझेल ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : राज्यात पेट्रोल पाच रुपये तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. पेट्रोल- डिझेलवरील कर कपात लवकरच केली जाईल, असे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले होते. त्यानुसार कॅबिनेटची बैठक झाली; यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत कर कपाती करण्याची घोषणा केली.

राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी तीन मोठ्या घोषणा नव्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या.
यात पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार आहे. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० राज्यातही राबविले जाणार आहे. आज मध्यरात्री १२ वाजेपासून सरसकट इंधन दरात सुट मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. उद्यापासून नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल कमी दरात मिळणार आहे.