कुडित्रे (प्रतिनिधी) : ज्या कंपनी लिंकिंग करणार त्या कंपनीचे खत घेतले जाणार नाही यासह अन्य निर्णय कोल्हापूर असोसिएशन ऑफ बी बियाणे, कीटकनाशक, खते, व्यापारी, संघटनेच्या बैठकीत घेण्यात आले.कोल्हापूर असोसिएशन ऑफ बी बियाणे कीटकनाशक खते व्यापारी संघटनेच्या विक्रेता मेळावा फुलेवाडी येथील पांडुरंग माने सांस्कृतिक हॉलमध्ये मेळावा झाला.
यावेळी बोलताना अध्यक्ष विनोद पाटील म्हणाले की, संघटनेमध्ये खतामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्याविषयी संघटनेने कठोर भूमिका घेतली आहे. त्या सर्व विक्रेत्यांनी निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आहे. यावेळी ज्या कंपनीची वारणी मिळणार नाही ते खत उतरून घेतले जाणार नाही. ज्या कंपनी एक्स खत देतील त्यांची खते उतरून घेणार नाही, ज्या कंपनी लिंकिंग करणार त्या कंपनीचे खत घेतले जाणार नाही असे तीन निर्णय घेण्यात आले. तसेच जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कोणतीही रेख अनलोडिंग होणार नाही असाही निर्णय घेण्यात आला. मेळाव्यात अध्यक्ष विनोद पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष विकास कदम, सचिव सागर खाडे तसेच सदस्य व विक्रेते उपस्थित होते.