जे शिवसेना सोडून गेले ते केवळ चकाकणारे बेन्टेक्स- खा. संजय मंडलिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेत सध्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जे शिवसेना सोडून गेले ते केवळ चकाकणारे बेन्टेक्स होते. तर जे राहिले आहेत ते शिवसैनिक शुद्ध सोन्यासारखे आहेत अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी बंडखोरांना टोला लगावला. कोल्हापुर येथे आज (रविवारी) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना खा.मंडलिक म्हणाले, शिवसेनेतील बारा खासदार शिंदे गटाला मिळाले हि निव्वळ अफवा आहे. त्यामध्ये कसलेही तथ्य नाही. एक-दोन खासदार वगळता बाकीचे सगळे खासदार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. आम्ही दोघे खासदार ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. धैर्यशील माने काही कामानिमित्त दिल्ली येथे आहेत.

या  पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार,विजय देवणे, कोल्हापूर शहर प्रमुख रविकरण इंगवले, सुनील मोदी, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, माजी आमदार सुरेश साळोखे,  माजी जिल्हाप्रमुख विनायक साळोखे, रवी चौगुले,  स्मिता मांढरे, राजू यादव रणजित आयरेकर, सुशील भादिंगरे,शशी बिडकर,दत्ता टिपुगडे, प्रीती क्षीरसागर आदी उपस्थित होते.

🤙 9921334545