बहिरेश्वर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवरील विद्यार्थ्यांना चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या माध्यमातून करमणूक तसेच त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार करण्यासाठी बाल चित्रपट चिल्लर पार्टी ही मोहीम शिवाजी पेठेतील शिवाजी विद्यालयाचे निवृत्त शिक्षक मिलिंद यादव करत आहेत. वि. मं पासार्डे शाळेतील विद्यार्थ्यांना आय एम कलाम हा चित्रपट त्यांनी निःशुल्क दाखविला.
यादव यांची ही मोहीम जवळजवळ चार वर्ष चालू आहे. संपुर्ण देशभर हा उपक्रम राबविणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. लहान मुले चित्रपट म्हटले की आवर्जून पाहतात. याचाच फायदा आपण उचलुन त्यांच्यावर सुसंस्कार घडविणे गरजेचं आहे. म्हणूनच उद्याची सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी मी हा खटाटोप करत असल्याचे त्यांनी सांगितलं. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंद यांनी यादव यांचा सत्कार केला.