मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भोवताली कोणत्या विशिष्ट नेत्यांचं कोंडाळं होतं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात आता काय झाडी… काय डोंगार.. काय हाटेल फेम आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचू न देणाऱ्यांची यादीच जाहीर केली.

या यादीतील पहिला नेता म्हणजे दररोज सकाळी उठून बडबड करणारे संजय राऊत. त्यानंतर अनिल देसाई, मिलींद नार्वेकर, विनायक राऊत, अरविंद सावंत, हे कोंडाळं उद्धव ठाकरेंना काहीच उमजून देत नव्हतं, असा घणाघात शहाजीबापूंनी केला. तर कोणत्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे याच नेत्यांच्या कोंडाळ्यातून यायचे जायचे आणि आम्ही बाजूलाच राहायचो, अशी खंत देखील शहाजीबापू पाटील यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, उद्धव ठाकरे मोठे नेते असले तरी आमचा नेता एकनाथ शिंदेच आहे. तसेच एकनाथ शिंदे करूणामय आणि दयाळू अंत:करणाचे नेते आहेत, असं देखील शहाजीबापू पाटील म्हणाले.