कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 75.04 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली आहेत.
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, भोगावती नदीवरील- हळदी व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व कुंभी नदीवरील- मांडूकली व शेणवडे असे 14 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणातून 14 हजार 152 तर अल्लमट्टी धरणातून 12 हजार 684 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 40.87 दलघमी, वारणा 324.35 दलघमी, दूधगंगा 200.20 दलघमी, कासारी 30.16 दलघमी, कडवी 23.98 दलघमी, कुंभी 32.46 दलघमी, पाटगाव 39.33 दलघमी, चिकोत्रा 19.44 दलघमी, चित्री 17.45 दलघमी, जंगमहट्टी 14.21 दलघमी, घटप्रभा 31.97 दलघमी, जांबरे 8.86 दलघमी, आंबेआहोळ 18.79, कोदे (ल.पा) 3.50 दलघमी असा आहे. तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 23.10 फूट, सुर्वे 22 फूट, रुई 48.6 फूट, इचलकरंजी 45.6, तेरवाड 39.9 फूट, शिरोळ 29.9 फूट, नृसिंहवाडी 23.7 फूट, राजापूर 10.9 फूट तर नजीकच्या सांगली 4.9 फूट व अंकली 5.4 फूट अशी आहे.
गगनबावडा येथे काल 190.8 मिमी पाऊस
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 190.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी 11.2 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 20.1 मिमी, शिरोळ – 8.1 मिमी, पन्हाळा- 64.1 मिमी, शाहूवाडी- 75.6 मिमी, राधानगरी- 87.2 मिमी, गगनबावडा-190.8 मिमी, करवीर- 52.5 मिमी, कागल- 58 मिमी, गडहिंग्लज- 24.4 मिमी, भुदरगड- 59.8 मिमी, आजरा- 33.4 मिमी, चंदगड- 34.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.