मुंबई : राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरचा कर लवकरच कमी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी केला, तशाच प्रकारचा निर्णय आता राज्यातही घेतला जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केलं आहे. यासोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तुलनेत शिंदे सेनेनेही सत्तेची फायनल जिंकली.
दरम्यान आभार भाषाणादरम्यान, नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडाकेबाज भाषण केले. यावेळी शिंदे यांनी सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय कर कमी करण्याची घोषणा केली होती. त्याच धरतीवर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल. त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील जनतेला होणार आहे. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येईल.’