कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेसाठी आज, रविवारी सकाळी आठपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी मतपेट्यांचे पूजन करण्यात आले. बँकेच्या १७ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात असून जिल्ह्यात २२ ठिकाणी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होत आहे.
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत चुरशीची तिरंगी लढत होत आहे. शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघ सत्तारूढ पॅनेल, पुरोगामी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’लं पुरोगामी- समविचारी परिवर्तन पॅनेल तर थोरात गटाच्या शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, समितीचे नेते जोतिराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी या पॅनेलमध्ये चुरशीची लढत होत आहे.
प्रचार काळात आरोप- प्रत्यारोप, शह-काटशाहाचे राजकारण झाले आहे. तिन्ही पॅनेलने थेट शिक्षक सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक तालुक्यात शिक्षक मेळावे घेऊन भूमिका मांडली.
उद्या, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी होणार आहे