जे आज केलं ते अडीच वर्षापूर्वी का केलं नाही? : उद्धव ठाकरे

मुंबई : . जे आज केलं ते अडीच वर्षापूर्वी का केलं नाही? तथाकथिक शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असे नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

सगळं अनपेक्षित घडतंय. मी आलोच होतो अनपेक्षितपणे. जातोही अनपेक्षितपणे. पण मी कुठेही जात नाहीये. मी पुन्हा एकदा शिवसेना भवनात बसायला सुरुवात करणार आहे. अशी प्रतिक्रीया उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना केली होती. त्यानंतर बंडखोर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाही असे स्पष्ट केलं.

कालच मी नव्या सरकारच अभिनंदन केलं. अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. अडीच वर्षापूर्वी मी अमित शहा यांना अडीच वर्षाचा फॉर्मुला सांगितला होता. मी अडीच वर्षाचा करार करायला तयार होतो. अडीच अडीच वर्षाचा काळ वाटून घ्यावा, अस ठरल होत. याबद्दल अमित शहांनी मला वचन देखील दिल होतं. पण त्यांनी त्यांचा शब्द मोडला. ठरल्याप्रमाणे केल असत तर भाजपला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळाल असत. पण अमित शहा यांनी दगा दिला. आज अडीच वर्ष पूर्ण होत आहेत. जे आज केलं ते अडीच वर्षापूर्वी का केलं नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना केला.
तथाकथिक शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असे नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.