जयसिंगपूर : शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आहे. तर यड्रावकर यांच्या समर्थनार्थ जयसिंगपूर येथे शेकडो समर्थक एकवटले आहेत. दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्की झाली आहे.

राज्यातच्या बदलत्या राजकारणात शिरोळ तालुक्याचे अपक्ष आमदार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने त्यांना मंत्रिपद गेले पण ते शिंदे यांच्यासोबत गेल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यांनी मंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे शिवसेना बंडखोर आमदार समर्थक आणि कट्टर शिवसैनिक यांच्यात आता रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे. अपक्ष आमदार आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बंडखोरी केल्यानंतर आता त्यांच्या मतदारसंघांमध्ये समर्थक एकटवले आहेत. आम्ही यड्रावकर म्हणून हजारो समर्थक त्यांच्या कार्यालयासमोर एकवटले आहेत. हे सर्व समर्थक एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देण्यासाठी एकवटले आहेत. या ठिकाणी शिवसैनिकांचा मोर्चा यड्रावकरांच्या कार्यालयासमोर येणार आहे. त्यामुळे शहरामध्ये यड्रावकरांच्या कार्यालयासमोर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.