कोल्हापूर : शिक्षक संघाच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचा कारभार करत बँकेला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले. पॅनेलची रचना करताना नवीन, होतकरू व प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देऊन आदर्श निर्माण केला आहे. सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिल्याने सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शिक्षक संघाच्या सत्तारूढ पॅनेलचा विजय निश्चित आहे, असा विश्वास शिक्षक नेते जनार्दन निऊंगरे यांनी व्यक्त केला.
आजरा येथे शिक्षक बँकेच्या प्रचारासाठी सत्तारूढ शिक्षक संघाच्या पॅनलच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

राज्याध्यक्ष राजाराम वरुटे म्हणाले, बँकेला उर्जितावस्था प्राप्त करून चांगला व्याज दिल्यामुळेच सभासदांमध्ये बँकेबाबत विश्वासार्हता निर्माण झाली.सत्ता मिळविणे एवढ्या पुरते मर्यादित न राहता शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचेही काम संघटनेच्या माध्यमातून केले.विज्ञान शिक्षकांचा प्रश्न, मुख्यालयी राहणेची अट,पीएफ,मेडिकल बिल पदोन्नती असे विविध प्रश्न सोडविले.
जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, चेअरमन बाजीराव कांबळे, उत्तम सुतार, रविंद्र नागटिळे, स्मिता डिग्रजे, दिलीप पाटील ,आजरा तालुका उमेदवार मायकेल फर्नांडिस यांची मनोगते झाली.मेळाव्याला शिक्षक सेनेचे कृष्णात धनवडे,दिलीप पाटील, नामदेव रेपे,राजमोहन पाटील, बजरंग गारे, अरुण पाटील, साहेब शेख, निवृत्ती भाटले, विष्णू मोरे, मारुती वरेकर आदी उपस्थित होते.
मेळाव्याचे संयोजन सरचिटणीस रवींद्र दोरुगडे, कार्याध्यक्ष संजय मोहिने, कोषाध्यक्ष संतोष शिवणे, उपाध्यक्ष अर्जुन पाटील, महादेव तेजम, सुभाष केसरकर, युनुस लाडजी, सुनिल कामत, सुनिल पाटील, रविंद्र कोंडुसकर, दशरथ कांबळे, पांडुरंग भाजगकर, रविंद्र नावलकर, सुभाष घाटगे, कृष्णा खाडे, संजय बागडी, संतोष आमणगी, प्रशांत पाटील, सुरेखा घाटगे, सुचिता लाड, अर्चना पाटील, सुमिना येसणे, रश्मी करबळी, शोभा हेरेकर, सुमन गुरव आदींनी केले. डॉ. मारुती डेळेकर यांनी सूत्रसंचालन केले.चेअरमन सुभाष चौगुले यांनी आभार मानले.
कोल्हापूर: आजरा येथे सत्तारुढ पॅनेलचा मेळावा झाला यावेळी शिक्षकनेते जनार्दन निंऊगरे,राजाराम वरुटे,संभाजी बापट,बाजीराव कांबळे,कृष्णात कारंडे आदी