डीसीपीएस संघटनेचा शिक्षक संघाच्या सत्तारूढ वरुटे पॅनेलला जाहीर पाठिंबा

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेने डीसीपीएस सभासदांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली आहे. संघटनेच्या मागणीनुसार बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने डीसीपीएस मधील सभासद मयत झाल्यास त्यांना पूर्ण कर्जमाफी देऊन त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे डीसीपीएस संघटनेने शिक्षक संघाच्या सत्तारुढ वरुटे पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला असून त्यांना मताधिक्याने विजयी करणार असा विश्वास डीसीपीएस संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाडळकर यांनी व्यक्त केला.

 डीसीपीएस संघटनेचा पाठिंबा व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात भव्य मेळावा झाला. त्याप्रसंगी पाडळकर बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजीराव पाटील होते.

यावेळी संघटनेचे विश्वस्त सर्जेराव सुतार यांनी डीसीपीएस मयत सभासद कल्याण योजनेची रक्कम पाच लाख रुपये वरून दहा लाख रुपये करावी, अशी मागणी केली.

सत्तारूढ गटाचे पॅनेल प्रमुख व शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे म्हणाले, संघटनेच्या मागणीनुसार मयत सभासद कल्याण योजनेची रक्कम निश्चित दहा लाख रुपये केली जाईल. तुमच्या संघटनेच्या पाठीशी शिक्षक संघ कायम राहील. प्रत्येक गोष्टीत संघटनेला मदत केली जाईल. शासन स्तरावर पाठपुरावा करून जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायमपणे प्रयत्न करू.निवडणुकीत तुम्ही ठामपणे सत्तारुढ गटाच्या पाठीशी उभा राहीलात त्यामुळे सत्तारूढ पॅनेल मोठ्या मताधिक्‍याने विजयी होईल.

यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, बँकेचे अध्यक्ष बाजीराव कांबळे, उमेदवार बबन केकरे, अनिल चव्हाण, काशिनाथ कुंभार, बाबासो साळोखे, लता नायकवडे यांनी सत्तारूढ पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी सरचिटणीस बाजीराव पाटील,कोषाध्यक्ष बाबुराव कांबळे, कार्याध्यक्ष संदिप कांबळे, उपाध्यक्ष संतोष गायकवाड, सल्लागार शिवतेज बाजारी,

रणजित जठार,भीमराव देशमुख,विजय रामाणे,रमेश नाईक, बाळाराम नाईक, अमर देसाई, शिवाजी बारड,नबीसो नायकवडी,  रवी जाधव,सुनील किरुळकर, जिल्हा महिला प्रतिनिधी राजश्री संगशेट्टी, सादिया मुजावर, सारीका पाटील, संगिता दिवटे, श्वेता खांडेकर उपस्थित होते.

🤙 8080365706