सर्व संघटना एकत्र आल्याने परिवर्तन पँनेलचा विजय निश्चित : सुरेश कांबळे

करवीर (प्रतिनिधी) : सत्तारूढ विरोधी वातावरण असल्याने व काही नेत्यांच्या आडमुठेपणामुळे एकास एक पँनेल तयार होण्यास यश आले नसले तरी बँकेचे रक्षक प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील आप’लं पुरोगामी – समिती – संघ समविचारी परिवर्तन पँनेलमध्ये जिल्ह्यातील अनेक संघटनांचे दिग्गज उमेदवार आहेत. त्यामुळे समविचारी परिवर्तन पँनेलचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन ‘आप’लं पुरोगामी-समिती-संघ समविचारी परिवर्तन पँनेलचे उमेदवार तथा शिक्षक नेते सुरेश कांबळे यांनी प्रचार दौऱ्याप्रसंगी केले.

सुरेश कांबळे यांनी करवीर तालुक्यातील शाळांना भेटी देत पँनेलची भूमिका आज सभासदांना पटवून दिली.     सभासदांच्या हितासाठी, बँकेत स्वच्छ, पारदर्शी व काटकसरीचा कारभार करणयासाठी आम्ही समान विचाराचे नेते मंडळी एकत्रित येऊन सभासदासमोर सक्षम पर्याय ठेवला आहे. सभासद आमच्या विरोधातील दोन्ही पँनेलच्या नेतेमंडळींच्या हुकुमशाही कार्यपध्दतीला कंटाळले आहेत. त्यामुळे सभासद समविचारी परिवर्तन पँनेलचा पर्याय निश्चित स्विकारतील. निवडणूक काळात विरोधी नेतेमंडळींच्या भूलथापांना बळी न पडता आपलं सर्वसमावेशक  परिवर्तन पँनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन कांबळे यांनी केले.

      सभासद हितासाठी आपल्या नेतृत्वाखालील संघर्ष व आपले शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील कार्य आम्ही जवळून अनुभवले असून आमचा पाठिंबा आपल्या परिवर्तन पँनेललाच असल्याचे अनेक सभासदांनी सांगितले.

      आजच्या प्रचार दो-यात पँनेल प्रमुख शंकर पवार, उमेदवार वैजनाथ दराडे यांच्यासह शशिकांत पोवार, सुभाष कुंभार, गुंगा पाटील आदी शिलेदार उपस्थित होते.